भाषण – 03.03.2024: जागतिक श्रवण दिवसानिमित्त राज्यपालांच्या हस्ते गरीब आणि गरजू कुटुंबातील कर्णबधिर मुलामुलींना श्रवणयंत्रांचे वाटप

03.03.2024: जागतिक श्रवण दिवसानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे गरीब आणि गरजू कुटुंबातील कर्णबधिर मुलामुलींना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकाराने सूर्योदय फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाट्रान्सको या कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून या शिबिरात २५० लहान मुलांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप केले. कार्यक्रमाला अनुराधा पौडवाल, कविता पौडवाल, महाट्रान्सकोचे संचालक विश्वास पाठक, टाइम्स समूहाचे विनायक प्रभू व WS ऑडिओलॉजी कंपनीचे मुख्याधिकारी अविनाश पवार उपस्थित होते.