पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांचे राज भवन मुंबई येथे स्वागत

पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवन मुंबई येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.यावेळी राज्याचे उदयोग व खनिजकर्म मंत्री सुभाष देसाई, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, राजशिष्टाचार प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, उदयोजक हर्ष गोंयका व निरंजन हिरानंदानी यांसह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.