गोरेगाव मुंबई येथे गोरेगाव महोत्सवाचे उद्घाटन

29.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोरेगाव मुंबई येथे गोरेगाव महोत्सवाचे उद्घाटन केले तसेच श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाचे श्रवण केले. उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, गोरेगाव महोत्सवाचे निमंत्रक जयप्रकाश ठाकुर, माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर, डाॅ. अशोक सिंह, विष्णू रानडे, आदी उपस्थित होते.