इंडियन जर्नल ऑफ ऑफ्थाल्मोलॉजी’च्या प्रकाशनाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

22.02.2020 : ऑल इंडिया ऑफ्थाल्मोलॉजिकल सोसायटी या नेत्रविकारतज्ञांच्या संस्थेचे वैज्ञानिक प्रकाशन असलेल्या ‘इंडियन जर्नल ऑफ ऑफ्थाल्मोलॉजी’च्या प्रकाशनाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पोस्टल स्टॅम्प व आवरणाचे प्रकाशन रा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी महाराष्ट्राचे पोस्ट मास्तर जनरल एच.सी. अगरवाल, सोसायटीचे मावळते अध्यक्ष डॉ. एस. नटराजन, उपाध्यक्ष डॉ. बरुन नायक, महासचिव डॉ. नम्रता शर्मा, डॉ. ललित वर्मा तसेच संपादक डॉ. संतोष होनावर आदि उपस्थित होते.