बंद

    26.01.2022 : राज्यपालांचे राजभवन येथे ध्वजारोहण

    प्रकाशित तारीख : January 26, 2022
    26.01.2022 : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.