31.12.2022: राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
31.12.2022: सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. हवामान केंद्र स्थापना सोहळ्याला सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील भारत-अमेरिका अभ्यास केंद्राच्या संचालिका प्राध्यापिका पारोमिता सेन, प्राध्यापक निल फिलिप, प्राध्यापक ब्रायन वॉन हल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु कारभारी काळे तसेच तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील विज्ञान, तंत्रज्ञान व पब्लिक पॉलिसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.
31.12.2022: A Solar Powered Weather Station for Climate Change Monitoring was installed in presence of Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Prof Paramita Sen, Adjunct Lecturer. Department. Chemistry, Earth Sciences, and Environmental Sciences, City University of New York, Prof Neal Philip, Prof Brian Van Hull of City University of New York, Prof Ujwala Chakradeo, Vice Chancellor SNDT Women's University, Prof Karbhari Kale, Officiating Vice Chancellor, Savitribai Phule Pune University and students from the Science, Technology and Public Policy Department of the City University of New York were present.