31.10.2025: सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन
31.10.2025:देशाचे दिवंगत उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राजभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली, तसेच राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील पुष्पांजली वाहण्यात आली. श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ही राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळली जाते. यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
31.10.2025: Raj Bhavan Officers and staff offered floral tributes to the portrait of the late former Deputy Prime Minister of India Sardar Vallabhbhai Patel on the occasion of his 150th birth anniversary at Raj Bhavan Mumbai. Floral tributes were also offered to the portrait of former Prime Minister of India late Indira Gandhi on her 41st death anniversary. Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware offered floral tributes to the portraits of Sardar Vallabhbhai Patel and Indira Gandhi. The birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel is celebrated as 'Rashtriya Ekta Diwas'.The Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware administered the National Integrity pledge to the staff and officers of Raj Bhavan on the occasion. Comptroller of the Governor’s Households Dr Nishikant Deshpande, staff and officers of Raj Bhavan were present.