31.10. 2023: महाराष्ट्र राजभवन येथे जम्मू व काश्मीर, लद्दाख केद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस साजरा
31.10. 2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लद्दाख केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस राजभवन येथे साजरा करण्यात आला. 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत या केंद्र शासित प्रदेशांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी लद्दाख येथील पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आलेल्या कलाकारांच्या चमूने तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी व युवा कलाकारांनी जम्मू व काश्मीर तसेच लद्दाखच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. लद्दाखचे जाब्रो लोकनृत्य, हाफिजा नृत्य, कव्वाली, माता वैष्णोदेवी गीत, लोकवाद्य संगीत आदी कार्यक्रम सादर करण्यात आले.
31.10. 2023: The Foundation Day of the Union Territories of Jammu and Kashmir, and Ladakh was celebrated in Maharashtra Raj Bhavan in the presence of Maharashtra Governor Ramesh Bais. The Union Territory Formation Day of Jammu and Kashmir, and Ladakh was celebrated as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India. A cultural programme depicting the rich culture and traditions of Jammu and Kashmir and Ladakh was presented on the occasion. Students and artists of University of Mumbai and the student- artists sent by the Department of Tourism and Culture, Ladakh presented the cultural programme. Folk dance and folk music of Ladakh, the Hafiza dance, Jobro Folk Dance, Mata Vaishno Devi song, Kawwali and other cultural programs were presented.