31.08.2025: राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन
31.08.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी बसवलेल्या पाच दिवसांच्या गणरायाचे राजभवन येथे फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती व ही मूर्ती नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती. विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, इस्कॉनचे गौरांग दास, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
31.08.2025: The eco-friendly Ganesh murti installed at the residence of Maharashtra Governor C. P. Radhakrishnan was immersed in an artificial pond at Raj Bhavan, Mumbai. The Governor joined the Raj Bhavan staff, officers and guests in performing the aarti of Lord Ganesha while bidding farewell to the God of Wisdom. The Governor then immersed the idol in a decorated artificial pond in front of his residence. The 5-day Ganesh installed at the Governor’s residence was made of shadu clay and was crafted by inmates of Nashik Prison. Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, ISKCON’s Gaurang Das, Deputy Secretary S. Ramamoorthy, and officers and staff of Raj Bhavan were present.