30.10.2023 : राज्यपालांच्या हस्ते ३५ वे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान
30.10.2023 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणारे ३५ वे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील विविध कंपनी व आस्थापनेतील ५१ गुणवंत कामगारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. कामगार क्रीडा भवन परळ मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार भारतीय मजदूर संघ या संस्थेला देण्यात आला. कामगार भूषण पुरस्कार टाटा मोटर्स पिंपरी पुणे येथील इलेकट्रिशिअन मोहन गोपाल गायकवाड यांना देण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या अर्धाकृती पुतळ्याला व रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. राज्यपालांच्या हस्ते श्रमकल्याण युग मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सदा सरवणकर, आमदार मनिषा कायंदे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, मुंबईचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, कामगार आयुक्त सतीश देशमुख, कामगार कल्याण आयुक्त, रविराज इळवे तसेच पुरस्कार विजेते व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.