30.09.2024: राज्यपालांची गोंदिया येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
30.09.2024: भंडारा जिल्हा दौऱ्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज गोंदिया येथे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू, प्रगतिशील शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्य, आदिवासी उद्योजिका, व्यावसायिक यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला व जिल्ह्य़ाच्या तसेज जनतेच्या समस्या समजून घेतल्या. सुरुवातीला जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यपालांसमोर गोंदिया जिल्ह्याविषयी सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. विपीन इटनकर, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी प्रजीत नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगनंतम यांसह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ नामदेव किरसान, माजी खासदार खुशाल बोपचे, उद्योजक शैलेश अगरवाल यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन जिल्ह्य़ातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
30.09.2024:After visiting Bhandara district, Governor C.P. Radhakrishnan arrived on the Gondia tour where he interacted with people's representatives, social workers, sportspersons, progressive farmers, members of women self-help groups, tribal entrepreneurs and businessmen. The District Collector made an elaborate presentation about Gondia district, its strengths, opportunities and challenges. In-charge Divisional Commissioner Dr. Vipin Itankar, DIG Ankit Goyal, Collector Prajit Nair, ZP CEO M Muruganantham and other senior government officials were present. MP Dr Namdev Kirsan, former MP Khushal Bopche, entrepreneur Shailesh Agarwal were among those who met the Governor.