Zoom 30.07.2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या दीक्षांत प्रांगणात संपन्न झाला. माजी खासदार (राज्यसभा) डॉ. विनय सहस्रबुध्दे यांनी दीक्षांत भाषण केले. दीक्षांत समारोहात पद्मभूषण प्रा. डॉ. जेष्ठराज जोशी यांना डी. एस्सी. तर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना डी. लिट. ही मानद पदवी देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाच्या उद्यम स्टार्टअप दालनाला भेट देऊन नव संशोधन व उद्यमिता उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी एकूण ११ हजार ८५१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले, तसेच १६२ संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर ५७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले . विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, विविध विष्यशाखांचे विभाग प्रमुख तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.
30.07.2026: Maharashtra Governor and Chancellor of universities Jishnu Dev Varma arrived in Solapur to preside over the 22nd Annual Convocation of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University (PAHSU). Senior officers of the district administration welcomed the Governor. A guard of honour was presented to the Governor. Vice Chancellor of PAHSU Prof. Dr. Prakash Mahanwar was also present.