30.06.2026: राज्यपालांच्या हस्ते ‘अटल संस्मरण’ या ग्रंथाचे प्रकाशन
Zoom 30.06.2026: दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकारण तसेच सार्वजनिक जीवनासंबंधी आठवणींचे संकलन असलेल्या 'अटल संस्मरण' या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे झाले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांचे माध्यम सल्लागार असलेले अशोक टंडन हे या ग्रंथाचे लेखक आहेत. सन २०२६ हे अटल बिहारी वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रकाशन सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, भजन सम्राट अनुप जलोटा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
30.06.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma released the book 'Atal Sansmaran' authored by the Media Advisor to the former Prime Minister late Atal Bihari Vajpayee at Maharashtra Lok Bhavan, Mumbai. The book was released as a tribute to the late Prime Minister whose birth centenary is being commemorated this year. Minister of Information Technology and Cultural Affairs Ashish Shelar, Bhajan Samrat Anup Jalota and invitees from different walks of life were present.