30.06.2026 : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 30.06.2026 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुलगुरूंनी दि. ५ जुलै रोजी पुणे येथे साजरा होणाऱ्या विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनाचे व महाकुंभ २.० च्या नवनिर्मितीचे तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याच्या अनावर सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण दिले.