29.05.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा ३५ वा स्थापना दिवस साजरा
30.05.2024: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा ३५ वा स्थापना दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. राज्यपालांच्या उपस्थितीत वाढवण येथील ग्रीनफिल्ड बंदराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) व पीएसए यांच्यात; तसेच जेपीएनए आणि सीएमएसीजीएम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सार्वजनिक खाजगी भागीदारीतील (पीपीपी) निवडक प्रतिनिधींचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राधिकरणाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते जेएनपीएचे विशेष आवरण व कॉर्पोरेट कस्टमाइज्ड माय स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले. जेएनपीएच्या ३५ व्या स्थापना दिनानिमित्त तयार केलेल्या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच भांडारकर पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित केलेल्या विशेष आवृत्तीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र किशन कुमार शर्मा, सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त राजेश पांडे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष, उन्मेष शरद वाघ, सचिव मनीषा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
30.05.2024: Maharashtra Governor Ramesh Bais presided over the 35th Foundation Day of the Jawaharlal Nehru Port Authority at a programme in Mumbai. Memoranda of Understanding between JNPA and PSA and between JPNA and CMACGM for the development of Greenfield Port at Wadhwan were signed in presence of the Governor. The Governor felicitated the representatives of Public Private Partnership (PPP) and officials of JNPA on the occasion. The Governor released the Coffee Table Book and the Special Edition on the 35th Foundation Day of JNPA brought out by Bhandarkar Publications. A Special Cover and Corporate Customized My Stamp of JNPA was also released on the occasion. Chairman of Mumbai Port Authority Rajiv Jalota, Additional Chief Secretary Sanjay Sethi, Chief Commissioner of Customs Rajesh Pandey, Chief Post Master General Maharashtra Kishan Kumar Sharma, Chairman of JNPA Unmesh Sharad Wagh, General Manager and Secretary Manisha Jadhav and Officers and staff of JNPA and invitees were present.