30.03.2025 : गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी उभारली गुढी
२८.०३.२०२५: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील लोकभवन येथे आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सने तयार केलेल्या मियावाकी शैलीतील जंगलाचे उद्घाटन केले. राज्यपालांनी मियावाकी वन प्रकल्पावरील माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले आणि या प्रसंगी फलकाचे अनावरण केले. या प्रकल्पांतर्गत, लोकभवनच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर ६००० चौरस फूट जागेवर ४८ जातींची २००० रोपे लावण्यात आली आहेत. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उपाध्यक्षा सुनीता रामनाथकर, चेंबरचे माजी अध्यक्ष राम गांधी, निरज बजाज, आशिष वैद, शैलेश वैद्य आणि अनंत सिंघानिया, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, आयएमसी लेडीज विंगच्या उपाध्यक्षा राज्यलक्ष्मी राव आणि इतर उपस्थित होते.
30.03.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना गुढीपाडवा व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.