29.12.2021: राज्यपालांची पुणे येथील क्वीन मेरी टेक्निकल संस्थेला भेट
29.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सशस्त्र सैन्य दलातील अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांना तंत्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणाऱ्या खडकी, पुणे येथील क्वीन मेरी टेक्निकल संस्थेला भेट देऊन तेथील कार्याची माहिती घेतली. सन १९१७ साली युद्धात जायबंदी झालेल्या जवानांच्या प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी क्वीन मेरी तंत्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. यावेळी राज्यपालांनी अपंगत्व आलेल्या जवानांच्या वैद्यकीय पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला देखील भेट दिली व उपस्थित दिव्यांग जवानांशी संवाद साधला.
29.12.2021: Governor Bhagat Singh Koshyari visited the Queen Mary's Technical Institute for the Differently Abled Soldiers at Khadki near Pune. The Governor enquired about the work being done by the Institute for the training and rehabilitation of the Divyang soldiers of the armed forces. The Queen Mary's Technical Institute was started in 1917 to provide technical skill based training to the soldiers injured during the war. The Governor also visited the Paraplegic Rehabilitation Centre which provides medical care and rehabilitation of Armed Forces personnel retired from service due to Spinal Cord Injury.