29.11.2025 : भारतीय पोलीस सेवेच्या २०२३ व २०२४ तुकडीतील प्रशिक्षणार्थी भापोसे अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
२९.११.२०२५ : २०२३ आणि २०२४ च्या बॅचमधील १३ प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱ्यांच्या पथकाने महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण) प्रवीण कुमार पडवळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
29.11.2025 : भारतीय पोलीस सेवेच्या २०२३ व २०२४ तुकडीतील १३ प्रशिक्षणार्थी भापोसे अधिकाऱ्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) प्रवीण कुमार पडवळ तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.