29.09.2021: राज्यपालांच्या हस्ते विविध राजभाषा पुरस्कार वितरित
29.09.2021: 'आशीर्वाद' या साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित २९ वे राजभाषा पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारची कार्यालये, उपक्रम तसेच राष्ट्रीयीकृत बँका व वित्तीय संस्थांना हिंदी प्रचार प्रसारासाठी हे पुरस्कार देण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते अभिनेते व संगीत नाटक अकादमीचे माजी अध्यक्ष शेखर सेन व गीतकार समीर अंजान यांना कला साहित्य क्षेत्रातील हिंदी सेवी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर पश्चिम रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयआयटी मुंबई, युनिअन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय जीवन विमा निगम, आयडीबीआय, भारतीय कापूस महामंडळ, नाबार्ड, यांसह इतर संस्थांना विविध प्रवर्गातील राजभाषा पुरस्कार देण्यात आले.
29.09.2021: Governor Bhagat Singh Koshyari presented the 29th Rajbhasha awards and best In-House publication awards to selected Central Government organisations, Nationalised Banks, financial institutions and Public Sector undertakings at Raj Bhavan, Mumbai. The awards were presented on behalf of ‘Aashirwad’ a socio, cultural and literary organization. General Manager of Western Railway Alok Kansal, Chairman of Aashir wad Brajmohan Agarwal, founder Dr Umakant Bajpai, Trustee Nita Bajpai, Dr Anant Shrimali and others were present.