29.09.2021: राज्यपालांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्सचे वाटप
29.09.2021: इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुंबईच्या वतीने आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन्स व मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्सचे वाटप करण्यात आले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुंबईचे अध्यक्ष सुरेश देवरा, महामंत्री विजय कुमार सिंघल, रेडक्रॉस सोसायटी व्यवस्थापन समितीचे सदस्य, दक्षिण आफ्रिकेच्या मुंबईतील वाणिज्यदूत आंद्रिया कुन, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद तसेच नेदरलँड्स, पोलंड, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड दूतावासातील महिला अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
29.09.2021: Governor Bhagat Singh Koshyari distributed sanitary napkins and multivitamin tablets to college students from underprivileged families at Patkar Hall of SNDT Women’s University, Mumbai. The programme was organized by the Indian Red Cross Society- Mumbai. Chairman of Indian Red Cross Society, Mumbai Suresh Deora, Honorary Secretary Vijay Kumar Singhal, Members of Managing Committee of Red Cross Society, Commissioner of Railway Police Qaiser Khalid, Consul General of South Africa in Mumbai Andrea Kuhn and Consulate officers from Netherlands, Switzerland, New Zealand and Poland were present.