29.08.2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंचे राज्यपालांना विद्यापीठाबाबत एक विस्तृत सादरीकरण
29.08.2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांनी प्रकुलगुरु डॉ पराग काळकर यांचेसह राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांचेसमोर विद्यापीठाबाबत एक विस्तृत सादरीकरण केले. बैठकीत राज्यपालांनी शैक्षणिक वेळापत्रक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, आदिवासी विद्यार्थी नोंदणी, विविध विषयांच्या पुस्तकांच्या मराठी भाषांतराची सद्यस्थिती, अंतर्वासिता धोरणाची अंमलबजावणी, महिलांसाठी तक्रार निवारण समिती, संस्कृत तसेच इतर भाषा विभागांची सद्यस्थिती यांसह विविध विषयांचा आढावा घेतला.
29.08.2024: Vice Chancellor of the Savitribai Phule Pune University Dr Suresh Gosavi accompanied by Pro Vice Chancellor Dr Parag Kalkar made an elaborate presentation on SPPU before State Governor and Chancellor of the universities C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. The Governor reviewed the issues such as observance of the Annual Academic Calendar, implementation of National Education Policy, Category Wise Enrollment of Students, Translation of Books in Marathi, Internship Policy Implementation, Women's Redressal Forum, Development of Sanskrit and other language