29.08.2023: राज्यपालांच्या हस्ते ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्काराचे वितरण
29.08.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राज्यातील ११ ग्रामीण उद्योजकांना 'ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार' राजभवन मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच 'मेघाश्रेय फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या 'ग्रामोद्योग' मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, मेघाश्रेय फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.
29.08.2023: Maharashtra Governor Ramesh Bais presented the 'Gramodyog Bharari Sanman Puraskar' to rural entrepreneurs from Maharashtra at Raj Bhavan Mumbai. The awards instituted by the Maharashtra State Khadi and Village Industries Board in association with the 'Meghashrey Foundation' were presented to 11 rural entrepreneurs. The Governor released the publication 'Gramodyog' on the occasion. Minister of Industries Uday Samant, Chairman of Maharashtra State Khadi and Village Industries Board Ravindra Sathe, Principal Secretary Industries Dr. Harshdeep Kamble, CEO of MSKVIB R Vimala, Dy CEO Bipin Jagtap, Founder of 'Meghashrey Foundation' Seema Singh and others were present.