29.01.2021 : राज्यपालांनी घेतली विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक
29.01.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच राज्यातील २० विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. विद्यापीठांचे २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे, विद्यापीठांमधील रिक्त संविधानिक पदांचा आढावा घेणे तसेच विद्यापीठांच्या वार्षिक लेखा परीक्षणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता बैठकीचे आयोजन केले होते.