28.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत रॉयल ऑपेरा हाऊस येथे रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
28.11.2022 : रशिया - भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील रॉयल ऑपेरा हाऊस येथे रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रशियातील ५० कोसॅक कलाकारांच्या चमूने 'क्रिनित्सा' हे संगीत, लोकरीती व युद्धकला यावर आधारित नृत्य सादर केले. भारतातील रशियन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन रशियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने मुंबईतील रशियन वाणिज्य दूतावास, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद पश्चिम विभाग व रॉयल ऑपेरा हाऊस यांच्या सहकार्याने केले होते.