28.10.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल चा ७० वा वर्धापन दिन संपन्न
28.10.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (TEXPROCIL) च्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम व पुरस्कार सोहळा हॉटेल जे डब्ल्यू मेरियट, सहार मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल 'कॉटन मॅन ऑफ इंडिया' सुरेश कोटक यांना वस्त्र शिरोमणी पुरस्कार देण्यात आला. संजय जयवर्थनलू (वस्त्र विभूषण) व राजेंद्रकुमार दालमिया (वस्त्र भूषण) यांना देखील सन्मानित करण्यात आले. अनिल कुमार जैन, एम. नाचिमुथू, दीपाली गोयंका, राजिंदर गुप्ता, एस पी ओसवाल, कुलिन लालभाई आदींना यावेळी वस्त्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष सुनील पटवारी, केन्द्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, टेक्सप्रोसिलचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल, कार्यकारी संचालक डॉ. सिद्धार्थ राजगोपाल आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
28.10.2024: Maharashtra Governor C P Radhakrishnan presided over the 70th Year Jubilee Celebrations of The Cotton Textiles Export Promotion Council (TEXPROCIL) at Sahar Mumbai. The Governor released the Special Souvenir on the occasion. The Governor conferred the 'Vastra Shiromani' Award on the 'Cotton Man of India' Suresh Kotak. Sanjay Jayavarthanalu (Vastra Vibhushan) and R K Dalmia (Vastra Bhushan) were also honoured. Anil Kumar Jain, M Nachimuthu, Deepali Goenka, Rajinder GUpta, S P Oswal and Kulin Lalbhai were presented the Vastra Ratna Awards. Sunil Patwari, Chairman TEXPROCIL, Roop Rashi, Textile Commissioner, Vijay Agrawal, Vice Chairman TEXPROCIL, Dr. Siddhartha Rajagopal, Executive Director TEXPROCIL and members of the Council were present.