28.02.2021 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
२८.०२.२०२१: राज्यपालांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ. विकास महात्मे, होळकर कुटुंबाचे वंशज यशवंतराव होळकर आणि न्यारिका होळकर आणि सागा फिल्म्स फाउंडेशनचे संस्थापक सागर धापटे उपस्थित होते.
28.02.2021 : सागा फिल्म्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ विकास महात्मे, होळकर घराण्याचे वंशज युवराज यशवंतराव होळकर व श्रीमती नायरिका होळकर, आमदार अभिमन्यू पवार व सागा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर धापटे प्रामुख्याने उपस्थित होते.