27.03.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक साक्षरता यासाठी बॉबकार्डने सुरु केलेल्या 'स्त्री टेक प्रगती' या उपक्रमाचे उदघाटन केले. या उपक्रमांतर्गत महिला बचत गट तसेच शालेय व महाविद्यालयातील मुलींमध्ये सायबर सुरक्षा व आर्थिक साक्षरता याबाबत जनजागृती केली जाणार आहे. बॉबकार्डच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आहान फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील निवडक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या डिजिटल लॅबसाठी संगणक वाटप करण्यात आले तसेच प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, बॉबकार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र राय, आहान फाउंडेशनच्या विश्वस्त शिल्पा चांडोलकर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती, बॉबकार्डचे सीएसआर प्रमुख रवी खन्ना यांसह विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि बचत गटांचे सदस्य उपस्थित होते.