27.02.2025: राज्यपालांची सहा विभागीय आयुक्त तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक
27.02.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राज्यातील सहा विभागीय आयुक्तांची तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राजभवन मुंबई येथे बैठक घेऊन वनहक्क कायदा, २००६ च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. प्रत्येक पेसा जिल्ह्यांमध्ये आदर्श आदिवासी गाव तयार करणे, समयबद्द पद्धतीने वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळांशी संपर्क वाढवणे, आरोग्य सुविधा वाढवणे, आदिवासी समाजातील विशिष्ट आरोग्य समस्या या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला आदिवासी विभागाचे सचिव डॉ विजय वाघमारे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहसचिव मच्छिन्द्र शेळके, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी (कोकण), चंद्रकांत पुलकुंडवार (पुणे), डॉ प्रवीण गेडाम (नाशिक), दिलीप गावडे (छत्रपती संभाजीनगर), श्वेता सिंघल (अमरावती) व डॉ माधवी खोडे चावरे (नागपूर) तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
27.02.2025: Maharashtra Governor C P Radhakrishnan today held a meeting of six divisional commissioners of the State and senior government officials to review the implementation of the Forest Rights Act, 2006, at Raj Bhavan, Mumbai. Issues such as creation of a Model Tribal Village in PESA areas, time bound implementation of FRA, improving enrollment of tribals in higher education, healthcare facilities, addressing Genetic Disorder issues in tribal areas, etc were discussed. The meeting was attended by Secretary of the Tribal Development Department Dr. Vijay Waghmare, Secretary to the Governor Dr. Prashant Naranware, Joint Secretary Machhindra Shelke, Commissioner of the Tribal Research and Training Institute Dr. Rajendra Bharud, Divisional Commissioners Dr. Vijay Suryavanshi (Konkan), Dr Chandrakant Pulkundwar (Pune), Dr. Praveen Gedam (Nashik), Dilip Gawde (Chhatrapati Sambhajinagar), Shweta Singhal (Amravati) and Dr. Madhavi Khode Chaware (Nagpur).