27.02.2021 : साहित्य, संस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना ‘वाग्धारा सन्मान’
२७.०२.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवन येथे वाग्धारा नवरत्न सन्मान प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध हिंदी लेखक डॉ. रामजी तिवारी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर चित्रपट अभिनेत्री शिखा मल्होत्राचा कोविड १९ महामारीच्या काळात केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, आयपीएस अधिकारी क्विसर खालिद आणि इतरांचाही सत्कार करण्यात आला.
27.02.2021 : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्य, संस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘वाग्धारा सन्मान’ देण्यात आले.