27.01.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत दुसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उदघाटन
27.01.2024 : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागातर्फे आयोजित दुसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सिडको प्रदर्शन केंद्र नवी मुंबई येथे संपन्न झाले. टाळ चिपळ्यांच्या गजरात राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार मंदा म्हात्रे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, डॉ सदानंद मोरे, राजा दीक्षित, देशमुख, संदीप दीक्षित, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर व विविध देशांमधून आलेले मराठी भाषाप्रेमी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते 'निवडक रवींद्र शोभणे' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.