26.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते सैन्यदलातील वैद्यकीय रत्न सन्मानित
२६.११.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोविड १९ साथीच्या काळात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सशस्त्र दलाच्या वैद्यकीय शाखेतील कोविड योद्ध्यांचा लोकभवन मुंबई येथे सत्कार केला. वीर सेनानी फाउंडेशनने हा सत्कार आयोजित केला होता. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस पुणे, आयएनएचएस अश्विनी, कमांड हॉस्पिटल (सदर्न कमांड), एनडीए मिलिटरी हॉस्पिटल, खडकवासला येथील अधिकारी आणि जवानांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
26.11.2021 : वीर सेनानी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सैन्यदलातील करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, वीर सेनानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कर्नल विक्रम पत्की, मानद सचिव डॉ भरत बलवल्ली, आश्रयदाते मधुभाई शहा तसेच सैन्यदलाच्या विविध वैद्यकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.