26.10.2022 : राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते ‘गढवाल पोस्ट’ रौप्य महोत्सव पुरस्कार प्रदान
26.10.2022 : राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते 'गढवाल पोस्ट' रौप्य महोत्सव पुरस्कार प्रदान
26.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश सिप्पी, विशाल भारद्वाज, अभिनेते कबीर बेदी, मनिषा कोईराला, हिमानी शिवपुरी, रेखा भारद्वाज, विजय कुमार धवन, अनिल शर्मा, प्रशासकीय अधिकारी संजीव चोप्रा आदींना 'गढवाल पोस्ट' रजत महोत्सव जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी 'गढवाल पोस्ट' वार्षिक पुरस्कार तसेच 'गढवाल पोस्ट' रजत जयंती पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. 'गढवाल पोस्ट' या देहरादून येथून प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी दैनिकाने आपल्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक, लेखक व कलाकार तिग्मांशू धुलिया, अभिनेत्री दिव्या दत्ता, अंजली नौरियाल, अलोक उल्फत, सुधांशु पांडे, शिवांगी जोशी, आदींना 'गढवाल पोस्ट' रजत जयंती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.