26.07.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या ‘सार्थक एजुकेशन ट्रस्ट’ या संस्थेचा १६ वा स्थापना दिवस संपन्न
26.07.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या 'सार्थक एजुकेशन ट्रस्ट' या संस्थेचा १६ वा स्थापना दिवस जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या 'नॉट फॉर प्रॉफिट' संस्थांसाठी असलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर सार्थक संस्थेचे लिस्टिंग करण्यात आले. कार्यक्रमाला सार्थक संस्थेचे संस्थापक डॉ. जितेंदर अगरवाल, सेवानिवृत्त केंद्रीय सचिव लव वर्मा, सिडबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वर्मा, सार्थकच्या सल्लागार मंडळाचे सदस्य क्रिशन कालरा व जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.
26.07.2024: Maharashtra Governor Ramesh Bais presided over the 16th Foundation Day of the Sarthak Education Trust, an organisation working for the Divyang Welfare at a programme held at World Trade Centre in Mumbai. The Sarthak Trust was listed as Not for Profit on the NSE's Social Stock Exchange on the occasion. Founder of Sarthak Dr Jitender Aggarwal, retired Secretary Lav Verma, CEO of SIDBI Sandeep Varma, Member of the Advisory Board of Sarthak Krishan Kalra and President of WTC Mumbai Vijay Kalantri were present on the occasion.