26.07.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा
26.07.2024: कारगिल विजय दिवसाच्या रजत जयंती दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. पवन चड्ढा, पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह, मे जन बिक्रम दीप सिंह, माजी जीओसी ले. जन. एच एस केहालों तसेच सैन्य दलातील आजी व माजी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी देशासाठी लढताना युद्ध भूमीवर हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबातील ११ वीर नारींचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी कारगिल विजय दिवस मोटरसायकल रॅलीला झेंडा दाखवून रवाना केले.
26.07.2024: Maharashtra Governor Ramesh Bais placed a wreath at the Colaba War Memorial and offered his homage to the martyrs on the occasion of the Silver Jubilee of the Kargil Vijay Diwas in Mumbai. At a programme organised by the General Officer Commanding, Maharashtra, Gujarat and Goa Area, the Governor felicitated 11 Veer Naris and addressed the officers of the armed forces. The Governor later flagged off the Kargil Vijay Diwas Motorcycle Expedition involving the jawans of 15 Battalion of the Assam Regiment. GOC in Chief Lt Gen Pawan Chadha, FOC in C Western Naval Command Vice Admiral Sanjay J Singh, Maj Gen Bikram Deep Singh, former GOC Lt Gen H S Kehlon and other serving and retired officers of the armed forces were present.