26.04.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा
26.04.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा दिवसाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भौगोलिक मानांकन प्राप्त करणारे प्रगतिशील शेतकरी व उद्योजक उपस्थित होते. बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रो गणेश हिंगमिरे यांच्या पुढाकाराने गोमुख येथील गंगाजलाच्या भौगोलिक मानांकनासाठी दाखल केलेला अर्ज राज्यपालांना सादर केला. भौगोलिक मानांकन प्राप्त केलेल्या उद्योजक व शेतकऱ्यांनी यावेळी राज्यपालांना केसर आंबा, बदलापूर जांभूळ व डहाणू चिकू यांच्या भौगोलिक मानंकानांचे तसेच राहुरी येथील कृषी विद्यापीठाने नोंदविलेल्या नानखटाईच्या पेटेंटचे प्रमाणपत्र सादर केले.