26.02.2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या विधिमंडळ सदस्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने बैस यांचे राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अनिल पाटील, अनिल परब, सुनील प्रभु, विनोद निकोले, कपिल पाटील हे देखील उपस्थित होते.