26.01.2024 : राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा शुभारंभ
26.01.2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे होत असल्याचे औचित्य साधून यंदा प्रथमच आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ' या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत जांबोरी मैदान, मुंबई येथे संपन्न झाले. महाकुंभाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई व उपनगर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, क्रीडा भारतीचे गणेश देवरुखकर तसेच मोठ्या संख्येने पारंपरिक क्रीडा प्रेमी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांसमोर तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महाकुंभाचे आयोजन महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगर पालिका व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पारंपरिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत.