25.11.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील मार ग्रेगोरियस ऑर्थोडॉक्स चर्चची सुवर्ण जयंती साजरी
25.11.2023 : भारतातील सर्वात जुने चर्च असलेल्या इंडियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या चेंबूर मुंबई येथील 'मार ग्रेगरियस ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च'चा सुवर्ण महोत्सव राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज व्ही एन पूर्व मार्ग चेंबूर येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च धर्मगुरु बॅसिलियस मार्थोमा मॅथ्यूज तृतीय, मुंबईचे मुख्य बिशप गीवर्गीस मार कुरीलोस, केरळच्या अंगमॅली धर्मप्रांताचे बिशप डॉ यूहानॉन मार पॉलिकार्पोस, अहमदाबाद धर्मप्रांताचे बिशप गीवर्गीस मार थिओफिलोस, चेंबूरच्या ग्रेगोरियस चर्चचे मुख्य धर्मगुरु फादर जॉय स्कारिया, पी जे चांडी, फिलिप मम्मेन तसेच निमंत्रित उपस्थित होते.
25.11.2023 : भारतातील सर्वात जुने चर्च असलेल्या इंडियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या चेंबूर मुंबई येथील 'मार ग्रेगरियस ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च'चा सुवर्ण महोत्सव राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज व्ही एन पूर्व मार्ग चेंबूर येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च धर्मगुरु बॅसिलियस मार्थोमा मॅथ्यूज तृतीय, मुंबईचे मुख्य बिशप गीवर्गीस मार कुरीलोस, केरळच्या अंगमॅली धर्मप्रांताचे बिशप डॉ यूहानॉन मार पॉलिकार्पोस, अहमदाबाद धर्मप्रांताचे बिशप गीवर्गीस मार थिओफिलोस, चेंबूरच्या ग्रेगोरियस चर्चचे मुख्य धर्मगुरु फादर जॉय स्कारिया, पी जे चांडी, फिलिप मम्मेन तसेच निमंत्रित उपस्थित होते