25.06.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत’महाराष्ट्र उद्योग संवाद’ चर्चासत्राचे उद्घाटन
25.06.2025: राज्यातील उद्योजकांच्या तसेच विविध देशांच्या वाणिज्य प्रतिनिधींच्या 'महाराष्ट्र उद्योग संवाद' चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे संपन्न झाले. महाराष्ट्र उद्योग संवादाचे आयोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच नॅस्काॅम यांच्यातील दोन सामंजस्य करारांचे हस्तांतरण करण्यात आले. उद्घाटन सत्राला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग सचिव पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासू आदी उपस्थित होते.
25.06.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan accompanied by State Chief Minister Devendra Fadnavis addressed the Plenary Session of Maharashtra Industry Dialogue at Jio World Convention Centre in Mumbai. The Maharashtra Industry Dialogue was organised by Maharashtra Industrial Development Corporation. Two Memorandums of Understanding were signed between the Government of Maharashtra and Nasscom on the occasion. Minister of industries Uday Samant, Minister of Protocol Jaykumar Rawal, Industry Secretary Dr. P. Anbalgan, CEO of MIDC P. Velrasu were among those present.