24.08.2023: एचएसएनसी बोर्ड या संस्थेच्या स्थापनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त कार्यक्रम संपन्न
24.08.2023 : हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) बोर्ड या सिंधी अल्पसंख्यांक संस्थेच्या स्थापनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते बोर्डाच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'चे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे माजी अध्यक्ष किशू मनसुखानी व विश्वस्त माया शहानी तसेच ओएसडी पदमा शाह यांचा संस्थेतील गौरवपूर्ण सेवेबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ निरंजन हिरानंदानी व सचिव दिनेश पंजवानी यांची देखील समयोचित भाषणे झाली. एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजन वेळूकर, माजी प्रकुलगुरु डॉ नरेश चंद्र, इगनूचे माजी कुलगुरु डॉ राजशेखरन पिल्लई, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच निमंत्रित उपस्थित होते.
24.08.2023: Maharashtra Governor Ramesh Bais presided over the inaugural ceremony of the 75th year Celebrations of the Hyderabad (Sind) National Collegiate (HSNC) Board at Raj Bhavan, Mumbai on Thursday (24 Aug). A vision document '75th Year Aspirations' was released on the occasion. The Governor felicitated former President of the Board Kishu Mansukhani, trustee Maya Shahani and OSD Padma Shah on the occasion. Vice Chancellor of University of Mumbai Dr Ravindra Kulkarni, former VC Rajan Welukar, President of HSNC Board Anil Harish, Provost of HSNC University Dr Niranjan Hiranandani, Secretary of the Board Dinesh Panjwani, former Pro VC Dr Naresh Chandra, Vice Chancellor of HSNC University Dr. Hemlata Bagla, teachers and invitees were present.