24.08.2022 : राज्यपालांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन
24.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देहू येथे श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे,भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते. संस्थानच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी देहू संस्थानच्या नोंद वहीत अभिप्रायही नोंदवला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांचे अभंग अनेक युगापर्यंत मानवजातीला मार्गदर्शन करतील असे त्यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.