25.04.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘जगातील लहान मुलांची सद्यस्थिती – २०२३, लसीकरण अहवालाचे प्रकाशन
24.04.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'जगातील लहान मुलांची सद्यस्थिती - २०२३, लसीकरण अहवालाचे प्रकाशन
24.04.2023 : संयुक्त राष्ट्रसंघाच्या लहान मुलांच्या अधिकारांसाठी कार्य करीत असलेल्या 'युनिसेफ' संघटनेतर्फे तयार करण्यात आलेल्या 'जगातील लहान मुलांची सद्यस्थिती - २०२३, लसीकरण, प्रत्येक मुलांकरिता' या अहवालाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झाले. कार्यक्रमाला युनिसेफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय अधिकारी राजश्री चंद्रशेखर, शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, 'आशा' सेविका, आरोग्य विभागाचे अधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.