24.02.2023 : राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ संपन्न
24.02.2023 : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तसेच विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे संपन्न झाला. या दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डि.लीट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती तसेच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.