24.01.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा
24.01.2024: राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपुर्वा पालकर, कौशल्य, रोजगार, उद्यमशीलता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी तसेच राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक व कलाकार उपस्थित होते. यावेळी राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कथक नृत्य, कजरी, ब्रज की होली व रामलीला सादर केले. तेजल चौधरी हिने यावेळी कथक नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशच्या सामाजिक, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा लघु माहितीपट दाखविण्यात आला.
24.01.2024: : Maharashtra Governor Ramesh Bais presided over the ' Uttar Pradesh State Foundation Day' at Raj Bhavan, Mumbai. The Uttar Pradesh State Formation Day was celebrated as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India. The UP State Formation Day was celebrated in association with the Maharashtra State Skills University. A cultural programme depicting Kajri, Braj Ki Holi, Ram Leela and Kathak was presented by the students of Maharashtra State Skill University on the occasion. Tejal Chaudhari made a Kathak presentation on the occasion. The Governor felicitated the students of the Skills university. Vice Chancellor of Maharashtra State Skills University Dr Apoorva Palkar, Commissioner, Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Nidhi Chaudhari and members of faculty and students of Maharashtra State Skills University were present.