22.12.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
22.12.2024 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ श्री षण्मुखानंद सभागृह, सायन, मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन शारदाश्रम विद्यामंदिर स्कूल ट्रस्टतर्फे करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दहावीतील व विविध क्रीडा स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला तसेच ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शारदाश्रम विद्यामंदिर स्कूल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजन गुप्ते, मानद अध्यक्ष पी. बी. देसाई, सचिव गजेंद्र शेट्टी, सेवानिवृत्त मेजर जनरल नितीन गडकरी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित होते.