22.09.2022 : राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
२२.०९.२०२२ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई आणि आसपासच्या २४ शाळांमधील सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि मुख्याध्यापकांना नव भारत टाईम्स यंग स्कॉलर पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांनी आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी, डीजी खेतान इंटरनॅशनल स्कूल, उत्पल संघवी ग्लोबल स्कूल, बिल्लाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूल, अपीजय स्कूल खारघर, डीएव्ही पब्लिक स्कूल ऐरोली, केंद्रीय विद्यालय आयआयटी पवई, रायन इंटरनॅशनल, सोमय्या स्कूल, बॉम्बे स्कॉटिश, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल आणि इतर शाळांच्या प्रतिनिधींना एनबीटी यंग स्कॉलर पुरस्कार प्रदान केले.
22.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे 'नवभारत टाइम्स 'यंग स्कॉलर्स'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी, डीजी खेतान इंटरनॅशनल स्कुल, उत्पल संघवी ग्लोबल स्कुल, बिलबॉन्ग हाय इंटरनॅशनल स्कुल, अपिजे स्कुल खारघर, डी ए व्ही स्कुल ऐरोली, रायन इंटरनॅशनल कांदिवली, सोमैया स्कुल, बॉम्बे स्कॉटिश, सुलोचनादेवी सिंघानिया स्कुल यांसह २४ शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळा प्रमुखांना यावेळी सन्मानित करण्यात आले.