21.08.2024: अंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली ‘उद्योजकता प्रोत्साहन’ संमेलनाचे आयोजन
22.08.2024 : अंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे 'उद्योजकता प्रोत्साहन' संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांनी युवा उद्योजक डॉ. दिव्या राठोड व निकुंज मालपाणी यांचा सत्कार केला. राज्यपालांच्या हस्ते '३७ कोटी स्टार्ट अप्सचा देश' आणि 'मंदिर अर्थशास्त्र' या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला स्वदेशी जागरण मंच (एसजेएम)चे अखिल भारतीय सह-संयोजक अजय पत्की, रा.स्व. संघाचे मुंबई विभाग संघचालक रवींद्र संघवी, आंतरराष्ट्रीय वैश फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप माहेश्वरी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते. उद्योजकता प्रोत्साहन संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन, मुंबई व स्वदेशी जागरण मंच, कोकण यांच्या वतीने करण्यात आले.
22.08.2024: Maharashtra Governor C P Radhakrishnan presided over the 'Entrepreneurship Promotion Programme' on the occasion of World Entrepreneur Day at World Trade Centre in Mumbai. The Governor felicitated young entrepreneurs Dr Divya Rathod and Nikunj Malpani on the occasion. The Governor also released two books '37 Crore Start Ups Ka Desh' and 'Temple Economics' on the occasion. Ajay Patki, All India Co-Convenor of Swadeshi Jagran Manch (SJM), Konkan, Ravindra Sanghvi, Vibhag Sanghachalak (RSS) Mumbai, Dilip Maheshwari, President, International Vaish Federation and Vijay Kalantri, President, World Trade Centre Mumbai were present. The programme was jointly organised by the International Vaish Federation and Swadeshi Jagran Manch, Mumbai.