22.06.2021 : डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राजभवन येथे संपन्न
२२.०६.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या पहिल्या सर्वसाधारण परिषदेची बैठक लोकभवन, मुंबई येथे झाली. यावेळी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, कार्यवाहक कुलगुरू डॉ. स्वाती वाव्हळ, डॉ. जयराम खोब्रागडे, डॉ. अविनाश दलाल आणि सदस्य उपस्थित होते.
22.06.2021: मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय व महाराष्ट्र शासनाचे सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे संपन्न झाली. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे सदस्य डॉ अनिल काकोडकर, विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ स्वाती वाव्हळ, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे अधिष्ठाता डॉ जयराम खोब्रागडे, कुलपतींचे सदस्य अविनाश दलाल आदी बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.