22.03.2026: उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत पुणे येथील निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा स्थापना दिवस संपन्न
Zoom 22.03.2026: उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उरुळीकांचन, पुणे येथील निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा स्थापना दिवस संपन्न झाला. कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, निसर्गोपचार आश्रमाचे विश्वस्त डॉ नारायण हेगडे आदी उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी यावेळी आश्रमातील सेवाकार्याची पाहणी केली, उपस्थितांशी संवाद साधला आणि आश्रमाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ नारायण हेगडे लिखित “सिक्रेट ऑफ हॅपिनेस' (आनंदाचे रहस्य) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
22.03.2026: The Vice President of India C P Radhakrishnan presided over the 81st Foundation Day of the Nisargopchar Ashram at Urulikanchan, Pune. Maharashtra Governor Jishnu Dev Varma, Deputy Chairman of Rajya Sabha Harivansh Narayan Singh, Deputy Chief Minister Sunetra Pawar, and Trustee of the Ashram Dr Narayan Hegde were among those present. The Vice President visited various service facilities at the Ashram, interacted with the attendees, and extended his best wishes for its future endeavours. The Vice President released the book titled “Secrets of Happiness” authored by Dr. Narayan Hegde.