22.03.2021 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘पर्यावरण बदल’ ऑनलाईन परिषद संपन्न
२२.०३.२०२१: राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील लोकभवन येथून ऑनलाइन व्यासपीठाद्वारे हवामान बदलावरील भारत-अमेरिका परिषदेचे उद्घाटन केले. गोवर्धन इको व्हिलेजचे संस्थापक राधानाथ स्वामी, मुंबईतील अमेरिकेचे कॉन्सुल जनरल डेव्हिड रँझ, उद्योगपती अजय पिरामल, न्यू यॉर्कमधील भारताचे कॉन्सुल जनरल रणधीर जयस्वाल आणि न्यू यॉर्क सिटी युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
22.03.2021 : गोवर्धन इको व्हिलेज व सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्क यांनी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पर्यावरण बदल या विषयावर भारत - अमेरिका परिषदेचे आयोजन केले होते, त्यामध्ये दूरस्थ माध्यमातून राज्यपाल सहभागी झाले होते. ऑनलाईन परिषदेत गोवर्धन इको व्हिलेज प्रकल्पाचे संस्थापक राधानाथ स्वामी, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रांझ, उद्योगपती अजय पिरामल, भारताचे न्युयॉर्क येथील वाणिज्यदूत रणधीर जयस्वाल तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.